Marathi Poems

Marathi Poetry मी माझाचे किस्से सांगतो
त्या दिवसात म्हणजे मी माझा नवा असताना निशिगंधा वाडचा पण एक काव्यसंग्रह येऊ घातला होता त्यासाठी तिने शांताबाई शेळक्यांवर प्रस्तावनेची जबाबदारी टाकली होती.. ठरल्याप्रमाणे शांताबाईनी प्रस्तावना लिहून दिली
निशिगंधाने ती प्रस्तावना वाचली तर तिची पंचायीत झाली.. कारण निशिगंधाच्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना शांताबाईनी पूर्ण मी माझाचंच कौतूक केलं होतं ... निशिगंधाने नम्रपणे ही गफलत बाईंच्या लक्षात आणून दिल्यावर बाई मनमोकळं हासत म्हणाल्या अगं काय करू, या पुस्तकानी मला झपाटूनच टाकलय.(शांताबाईंकडून मी माझा साठी हे उद्गार म्हणजे मी माझा बहुमानच समजतो) .हा किस्सा मला स्वत: निशिगंधानेच सांगितला