मी माझाची जन्मकथा....
मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्ष पूर्ण झाली यात काही विशेष नाही, काही घडलं तरी काळानुसार दिवस महिने वर्ष पार पडतच असतात पण मी माझाच्या बाबतीत सांगायचं तर चार ओळींची कविता घेऊन आलेला हा संग्रहं रसीकानी उचलून धरला विस्मरणात जाऊ दिला नाही आजमितीस लाखो प्रती खपल्या अनेक भाषात त्याचं रुपांतर झालं पंचवीस वर्षात सांगितलं तर खोटं वाटेल पण मी माझ्याच्या कवितानी प्रेरीत होऊन अनेकानी लेखणी हातात घेतली आणि अंदाजे तीस हजाराच्या घरात चार ओळींचे संग्रहं प्रकाशीत झाले
पुढे पहा